About us
प्रस्तावना...
या भूमंडळातील आशिया खंड प्रायदेशी सुवर्णभूमी असलेल्या भारतातील शिवबांच्या, संत महात्मा फुले, आंबेडकर सावरकरांच्या महाराष्ट्र प्रांतातील पुण्यभूमी 'रायगड'. रायगड जिल्ह्यातील अफसान नावबाच्या नावाने पूर्वी ओळख असलेला म्हसळा तालुक्याची भावी पिढीतील जनमानसात होऊन "म्हसळा" सर्वांगीण उठून दिसावा अशी तळमळ प्रत्यक्ष श्री रमेश पां. पोटलेे यांनी वृत्तपत्र माध्यमातून सुरू केली. प्रतक्षात रामनवमी २००८ साली म्हसळा टाईम्स पाक्षिकापासून सुरू होऊन २५ एप्रिल २०१७ मध्ये त्याचे दैनिकात रुपांतर झाले. वृत्तपत्र माध्यमाच्या दुनियेत त्यांनी केलेले हे धाडसच म्हणावयास हवे.
आता डिजिटल युगातील सोशल मीडियाच्या बदलत्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी "दि म्हसळा टाईम्स" सज्ज झाला आहे. www.dailythemhaslatimes.in या वेबसाईटद्वारे आपण दररोज भेटणार आहोत. त्यसंबंधी अभिप्राय, सूचना, जाहिरात व इतर गोष्टी आपण यावर शेयर करूया.
धन्यवाद ...!!!
आपला
संस्थापक श्री रमेश पां. पोटले
वृत्तपत्र हे व्रत असल्याची जबाबदारी शिरावर घेऊन जन्मापासूनच दि म्हसळा टाईम्स वर्धापनदिन सोहळा साजरा करीत असतो. हे करीत असताना सामाजिक समतेचे भान ठेवून कवी संमेलन, विद्यार्थी गुणगौरव समारंभ, निबंध स्पर्धा, शैक्षणिक साहित्याचे वाटप, महाराष्ट्र लोकसेवा/पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, पत्रकारिता प्रशिक्षण, सन्मान पुरस्कार प्रोत्साहन सोहळा, दिनदर्शिका प्रकाशन आणि दिवाळी अंकाचे दरवर्षी प्रमाणे कवी, लेखक, विचारवंतांना दालन उपलब्ध करीत असतो. त्या सर्वांचे तसेच जाहिरातदार व मान्यवरांचे ऋणी आहोत.
तालुक्याच्या नावाचे दै. "दि म्हसळा टाईम्स" या भूमंडळावर सातत्याने मिरवत राहावे याकरिता जसे आजपर्यंत हस्ते-परहस्ते, संवादी, ज्ञान-धनाची जी ममाणुसकी जपली तशीच ताकद पुढेही जगात विहार करताना आमच्या पंखाना बळ मिळो अशी जगनिर्मात्या कडे दोन्ही कर जोडून प्रार्थना आहे.
Post a Comment
0 Comments